त्या गोष्टी

 आई तुझ्या गोष्टी अजूनही आठवतात ग

एक होता कावळा आणि एक होती चिमणी

त्यां अनेक गोष्ट.....


परीची ती गोष्ट

मी परी म्हणून तू सांगायची

मलाही आता परी सारखं व्हाचंय ग


आई मला त्या घोड्यावर सैर

करायची आहे ग

घोड्याच्या स्वारीतून फिरायच आहे ग


आई मला त्या गोष्टी

पुन्हा ताज्या करायच्या आहेत ग


कोल्ह्याची ती गोष्ट

तो जसा स्वतःच डोकं वापरतो

तसं मलाही माझं डोकं योग्य रीतीने वापरायचं आहे ग


आई मला त्या गोष्टी

पुन्हा ताज्या करायच्या आहेत ग


जादूच्या आगळ्या-वेगळ्या गोष्टी

वेग वेगळे जादू करून प्रोत्साहित करणे

मला ते पुन्हा नव्याने पाहायचे आहे ग


आई, जशी तू कासव आणि सश्याची गोष्ट सांगायची

विचार करत होते मी.... 

कोण तरी जिंकेल??


आई तेव्हा जसा कासव जिंकला 

तसं मलाही हळू हळू करत 

जीवनात यशस्वी व्हायचं आहे ग


आई मला त्या गोष्टींचे

आता महत्त्व लक्षात आले आहे ग

Comments